रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

लव लव करी पात !
लवलव करी पात
डोळं नाही थार्‍याला
एकटक पाहु कसं
लुकलूक तार्‍याला

चव चव गेली सारी
जोर नाही वार्‍याला
सुटं सुटं झालं मन
धरू कसं पार्‍याला

कुणी कुणी नाही आलं
फडफड राव्याची
रूणझूण हवा का ही
गाय उठे दाव्याची

तटतट करी चोळी
तूट तूट गाठीची
उंबर्‍याशी जागी आहे
पारूबाई साठीची
उठे उठे चित्त उठे :
मधमाशी पोळ्याची;
कायावाचामन सारं
बागशाही माळ्याची.
सरभैर येडंपिसं
लवलव छातीचं,
आल्या आल्या कसं सोडू
पारवळ हातीचं.
----कवी आरती प्रभू ( नक्षत्रांचे देणे )

एखाद्याचं ड्रॉइंग चांगलं असल, म्हणजे त्याने हुबेहूब काढलेले असले की आपण त्याला प्रोत्साहन देतो व त्याच्या वकूबाप्रमाणे तो जर जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेला की तो चित्र विचित्र आकार, रंग काढू लागतो, पासिद्धी पावतो व त्याची चित्रे लाखालाखाला विकल्या जावू लागतात. तो कधीही मग हुबेहूब चित्र काढीत नाही. हे जसे चित्रकलेत होते तसेच काव्यातही असे होते. र ला ट लावून “माझी आई”वर निरागस ओळी रचणारा जरा प्रसिद्ध झाला की न कळणाऱ्या प्रतिमा, शब्द, विषय वापरून अप्रतीम संभ्रम निर्माण करणाऱ्या कविता करू लागतो.
आरती प्रभू ह्यांच्या वरील कवितेत शब्द अगदी साधे आहेत, छोटे छोटे आहेत, कळणारे आहेत. इतके की त्याचे गीत हृदयनाथांनी केले व ते लोकप्रियही झाले आहे. पण हृदयनाथांना वाटते की ह्याचा अर्थ काहीसा गूढ, जिवा-शिवाचा, शरीर-आत्मा संबंधी आहे. खरेच आहे का तसे ?
हलणारे लवणारे शरीर हे पाते आहे, पण ध्येयाला लुकलुकणाऱ्या ताऱ्याला पाहावे कसे? तरुणपणाचे वारे आता तसे जोर धरणारे नाहीय व मन सुट सुट झालय. त्याला वा त्या रूपाला ( पारा: दर्पण ) आता कसे धरावे ? फडफड करणाऱ्या पक्षाची फडफड पाहून कोणी आले नाही पण रुणझुणणारी हवा जाणवून दाव्याने बांधलेली गायही उठून जाते आहे. तारुण्याची तटतट चोळीला तूटते आहे व सोबतीला जुना हलकासा पहारा देणारी साठीची पारूबाई आहे. काया वाचा मन हे सारं मधमाशांच्या पोळ्याला पाहून उत्तेजित होते आहे, पण माळ्याची बागशाही देखरेख आहे. सैरभैर करणारे वेडेपिसे करणारे तारुण्याच्या छातीची लवलव आहे पण मी आल्या आल्याच माझ्या पक्षिपणाचं पारवळ ( पारवापण/ पारवावळ ) सोडून कसं भरकटू ?
आहे की ही जिवा-शिवाची कविता !
-------------------------------------   

लव लव करी पात !
लवलव करी पात
डोळं नाही थार्‍याला
एकटक पाहु कसं
लुकलूक तार्‍याला

चव चव गेली सारी
जोर नाही वार्‍याला
सुटं सुटं झालं मन
धरू कसं पार्‍याला

कुणी कुणी नाही आलं
फडफड राव्याची
रूणझूण हवा का ही
गाय उठे दाव्याची

तटतट करी चोळी
तूट तूट गाठीची
उंबर्‍याशी जागी आहे
पारूबाई साठीची
उठे उठे चित्त उठे :
मधमाशी पोळ्याची;
कायावाचामन सारं
बागशाही माळ्याची.
सरभैर येडंपिसं
लवलव छातीचं,
आल्या आल्या कसं सोडू
पारवळ हातीचं.
----कवी आरती प्रभू ( नक्षत्रांचे देणे )

एखाद्याचं ड्रॉइंग चांगलं असल, म्हणजे त्याने हुबेहूब चित्र काढलेले असले की आपण त्याला प्रोत्साहन देतो व त्याच्या वकूबाप्रमाणे तो जर जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेला की तो चित्र विचित्र आकार, रंग काढू लागतो, पासिद्धी पावतो व त्याची चित्रे लाखालाखाला विकल्या जावू लागतात. तो कधीही मग हुबेहूब चित्र काढीत नाही. हे जसे चित्रकलेत होते तसेच काव्यातही असे होते. र ला ट लावून “माझी आई”वर निरागस ओळी रचणारा जरा प्रसिद्ध झाला की न कळणाऱ्या प्रतिमा, शब्द, विषय वापरून अप्रतीम संभ्रम निर्माण करणाऱ्या कविता करू लागतो.